मला माझ्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे


#1

मला माझ्या व्यवसायासाठी कर्ज हवे आहे.


#2

आपण वैयक्तिक कर्जासाठी जात असाल तर आपण खालील गोष्टी जाणून घ्याव्या:

  • जर आपण नवीन व्यवसायिक मालक असल्यास तर कोणी तुम्हाला कर्ज द्यायला तयार होईलच असे सांगणे अवघड असते. अशावेळी वैयक्तिक कर्जासाठी मंजूरी मिळविणे सोपे असते कारण कर्ज देणारे फक्त वैयक्तिक पातळीवर तुमच्या कर्ज परतफेडीचा इतिहास व उत्पन्न तपासून बघतात.

  • अनेकदा कर्ज देणार्‍या कंपन्या वैयक्तिक कर्जाचे वितरण काही दिवसातच करतात. जर आपल्याला आवश्यक पैशांची गरज असेल तर वैयक्तिक कर्ज चांगला पर्याय असू शकतो.

  • बहुतेक कर्जदारांना वैयक्तिक कर्जासाठी कोणतीही सुरक्षा आवश्यक नाही, म्हणूनच वैयक्तिक कर्जाची परतफेड वेळेत झाली नाही तर कर्ज देणार्‍याला तुमची संपत्ती ताब्यात घेता येत नाही.

  • जर व्यवसाय अयशस्वी झाला व कर्जाची परतफेड वेळेत केली नाही तर तुमच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोरवर परिणाम होऊन तो कमी होतो, तुम्हाला भविष्यात इतर प्रकारच्या कर्जाची मंजूरी मिळणे अवघड जाते.

  • बहुतेक बँक व एनबीएफसी कर्जाच्या रकमेची विशिष्ट टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून लावतात. म्हणजेच कर्ज घेणार्‍याला कमी रक्कम प्राप्त होते, कोणतेही तारण नसल्यामुळे वैयक्तिक कर्जांचे व्याज दर नेहमीच खूप जास्त असतात.

तर त्यानुसार निर्णय घ्या.