मला जीएसटीसाठी फाइल करायची आहे. मी ते ऑनलाइन कसे करू?


#1

मला जीएसटी फाइलिंगबद्दल माहिती पाहिजे आहे.


#2

ऑनलाइन जीएसटी रिटर्न फाइल करण्याची पद्धत:

  • जीएसटी वेबसाइट (https://www.gst.gov.in/) वर रजिस्ट्रेशन करा.
  • वेबसाइट वर लॉगिन केले की तुम्हाला जीएसटी स्टेट कोड व पॅन नंबर विचारला जाईल आणि त्यानंतर १५ आकड्यांचा आयडेंटिफिकेशन नंबर तुम्हाला दिला जाईल.
  • इनवॉइस अपलोड केले की प्रत्येक इनवॉइस साठी एक रेफेरन्स नंबर दिला जाईल.
  • इनवॉइस अपलोड केल्यावर इनवर्ड (आवक), आऊटवर्ड (जावक) व एकूण मासिक रिटर्न ऑनलाइन फाइल करा.
  • माहिती सेक्शनमध्ये जीएसटी रिटर्न फॉर्म भरा.
  • याचे सर्व तपशील जीएसटीआर–२ए मध्ये दिसतील
  • सप्लायरने भरलेले तपशील तपासून बघा, आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करा. डेबिट व क्रेडिट नोट देखील फाइल करणे जरूरी असते.
  • जीएसटीआर २ फॉर्ममध्ये (मासिक रिटर्न ज्यात टॅक्सेबल माल व सेवांच्या खरेदीचे वर्णन असते) तुम्ही खरेदी केलेल्या टॅक्सेबल मालाची माहिती भरा.
  • तुम्ही बदललेली माहिती पुरवठादाराला (सप्लायरला) स्वीकारता अथवा नकारता येत नाही.