मी माझ्या व्यवसायासाठी अधिक ग्राहक कसे आकर्षित करू?


#1

माझ्या व्यवसायात काही ग्राहक नाही, नफा प्रभावित होत आहे,मला काळजी वाटते.


#2

नफा आणि निष्ठावंत ग्राहक वर्ग मिळवण्याचा एकमात्र उपाय म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे …

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करा आणि त्यांना एक सुखद अनुभव द्या!

ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी येथे काही टीप आहेत:

  • ग्राहकाला सर्वोत्तम अनुभव द्यायचा प्रयत्न करा. हे करण्यासाठी ज्या उत्पादनांना मागणी आहे ती दृश्य ठिकाणी ठेवा, जिथे शक्य आहे तिथे डिसकाऊंट द्या, ग्राहकांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण आपल्या कर्मचार्‍यांना द्या, आणि चेकआऊट प्रक्रिया सुटसुटीत करा.आपल्या व्यवसायासाठी खराब ग्राहक सेवा धोकादायक असेल.
  • थेट विक्री करण्यास प्रारंभ करू नका किंवा आपल्या समस्येसाठी आपल्याला सर्वोत्तम उपाय सांगू नका. त्यांच्या गरजा समजून घ्या आणि नंतर त्यांना कशी मदत करावी याबद्दल विचार करा. हे शक्य होण्यासाठी योग्य मार्ग सुचवा.मदत करणारे ब्लॉग पोस्ट, संबंधित विडियो, फोरमचे लिंक इत्यादी सारख्या छोट्या गोष्टीमुळे पण ग्राहक खुश होतात आणि त्यांना चांगला अनुभव येतो.
  • निष्ठावंत ग्राहक तुमच्या कंपनीचे सगळ्यात मौल्यवान संसाधन असतात.काही उद्योग क्षेत्रात 5% अधिक ग्राहक निष्ठावंत असतील तर नफा 95% पर्यन्त वाढू शकतो.नवीन ग्राहक शोधून त्यांना विक्री करण्याच्या तुलनेत विद्यमान ग्राहकांना परत परत विक्री करणे कधीही सोपे असते, म्हणून ग्राहक निष्ठावंत असले तर तुमचा मार्केटिंग खर्च कमी होईल.
  • आनंदी ग्राहक आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला त्यांच्या आवडत्या ब्रॅंडबद्दल नेहेमीच सांगतात. ही निशुल्क होणारी जाहिरात म्हणजे सगळ्यात प्रभावी मार्केटिंग ठरते.
  • तुमची उत्पादने, तुमच्या प्रक्रिया आणि ग्राहकाला मिळणारा एकूण अनुभव यात कल्पकता वापरुन सतत बदल करत रहा ज्यामुळे ग्राहक आनंदी होतील.लहान प्रमाणावर बदल म्हणजे तुमच्या कर्मचार्‍यांना ग्राहकांचे प्रश्न हाताळण्याची पद्धत शिकवणे, वेबसाइट वरील मजकूर अशा प्रकारे लिहिणे की ग्राहकाला तुमच्या उत्पादनात मूल्य आहे असे वाटेल.
  • तुमच्या ग्राहकांशी सकारात्मकपणे संपर्क ठेवा आणि तुमच्या उद्योगात नक्कीच वाढ होईल!