पेमेंट गेटवे म्हणजे काय? माझ्या लहान व्यवसायासाठी ते कसे महत्वाचे आहे?


#1

मला पेमेंट गेटवेबद्दल जाणून घ्यायचे आहे.


#2

ग्राहकांना पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात, आणि त्याच बरोबर ग्राहकांनी दिलेले पैसे उद्योगाच्या खात्यात जात आहेत याची खात्री करण्यात, पेमेंट गेटवेची भूमिका महत्त्वाची असते!

विक्रेता व ग्राहक ह्यांच्यात पैशाची ट्रान्सफर मंजूर करण्यासाठी दोन्ही पक्षांमधील दुव्याचे काम पेमेंट गेटवे करते. ग्राहकाने ऑर्डर नक्की करून पेमेंटचे तपशील ऑनलाइन प्रविष्ट केले की ग्राहकाच्या बँक खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यापूर्वी पेमेंट गेटवे अनेक प्रक्रिया करते.

बाजारात अनेक पर्याय असल्याने योग्य पेमेंट गेटवेची निवड करणे कठीण होते. गेटवे निवडताना तो होस्टेड आहे की इंटीग्रेटेड हे ठरवणे महत्वाचे असते. पे-पॅल सारखे होस्टेड गेटवे ग्राहकाला पेमेंट प्लॅटफॉर्मच्या प्रॉसेसरकडे नेतात आणि तिथे व्यवहार पूर्ण होतो.

पण होस्टेड गेटवेचा फायदा म्हणजे ग्राहकाचा डेटा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी गेटवेची असते व हा पर्याय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात उपयुक्त ठरतो. इंटीग्रेटेड गेटवे तुमच्या ई-कॉमर्स साईट मध्येच एंबेड केले जाते ज्यामुळे ग्राहक तुमची वेबसाइट सोडून जाण्याची भीती नसते.

मात्र ग्राहकाचा डेटा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमचीच असते. केवळ हेच महत्त्वाचे नसून, सायनिंग-अप फी, कराराच्या अटी, करन्सीसाठी आधार, फ्रॉड टाळण्याचे उपाय व प्लॅटफॉर्मतर्फे दिली जाणारी इतर मदत देखील लक्षात घेणे गरजेचे असते.