मी कर्जासाठी अर्ज केला होता आणि ते मंजूर केले गेले. यानंतर मी काय करावे?


#1

कर्ज मंजूर झाल्यानंतर काय करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.


#2

भविष्यात कर्जाच्या अर्जाला मान्यता मिळणे सोपे व्हावे म्हणून कर्जाची वेळेतच परतफेड करणे आवश्यक असते.आपल्या बँक खात्यातून स्वयंचलित पेमेंटची व्यवस्था करा जेणेकरून कर्जाची परतफेड वेळेवर केली जाईल.

कर्जाची मुदत संपण्यापूर्वीच परतफेड करणे शक्य आहे का हे तपासून बघा. तुमच्या उद्योगाच्या कॅशफ्लो मधून कर्जाच्या मुद्दलाची परतफेड करता आली तर व्याजाचे पैसे वाचतील आणि अनुकूल क्रेडिट इतिहास देखील निर्माण होतो.

उद्योग कर्ज मिळाल्यानंतर काही महिन्याने क्रेडिट स्कोर बघा. कर्जाची समाधानकारक परतफेड केल्यास तुमचे बिजनेस क्रेडिट रेटिंग सुधारते.

तुम्हाला अल्पावधीचे कर्ज मिळाले असल्यास त्याचे रूपांतर कमी व्याज दराच्या दीर्घावधीच्या कर्जात करू शकता. तुमच्या व्यवसायाची उलाढाल सतत वाढत असेल आणि क्रेडिट स्कोर सुधारत असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

कर्ज देणार्‍याशी उत्तम संबंध ठेऊन वेळेवर परतफेड केल्यास तुम्हाला भविष्यात चांगल्या अटींवर कर्ज मिळू शकते.

कर्जाच्या रकमेचा वापर काळजीपूर्वक करा. ज्या प्रकल्पात काही निष्पन्न होणार नाही अशावर भांडवलाची उधळपट्टी करू नका.