मी माझा व्यवसाय विस्तारित करण्याचा विचार करीत आहे. हे करण्यापूर्वी विचार करण्याच्या गोष्टी काय आहेत?


#1

मी माझा व्यवसाय विस्तारित करण्याचा विचार करीत आहे.


#2

व्यवसायात विस्तार हा एक मोठा स्टेप आहे.व्यवसायाच्या मालकाने प्रथम विचार केला पाहिजे, हा चरण व्यवसायावर कसा प्रभाव पाडेल.आणि आपण हे चरण घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

विस्तार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीची संसाधने, म्हणजेच तुमचे कर्मचारी, यांची परिस्थिती तपासून पहा. कंपनीची आर्थिक स्थिती, आणि कंपनी प्रदान करणार्‍या सेवा व उत्पादने यांचे पण काळजीपूर्वक मूल्यांकन करा.

मग आपण विस्तारासाठी कसे जायचे ते ठरवू शकता. उदा: नवीन ठिकाणी दुकान उघडावे किंवा नवीन उत्पादने व सेवा विकसित कराव्या.

व्यवसायाच्या विस्तारामध्ये जोखीम समाविष्ट आहे. आपल्याला व्यवसायाची आर्थिक स्थिती विचारात घ्यावी लागेल.

नवीन उत्पादने किंवा सेवा विकसित करून विस्तार करणार असाल तर तसे करण्यापूर्वी आसपासच्या स्थानिक ग्राहकांचा अंदाज घ्या. त्यांची जी मागणी विद्यमान स्थितीत पूर्ण होत नसेल ती आधी पूर्ण करण्याचा विचार करा.

तुमच्या व्यवसायाच्या विस्ताराने नक्की काय बदल होतील व तुमच्या ग्राहकांना काय हवे आहे हे समजून घ्यायला सर्वेक्षण करा. ग्राहकांशी ईमेल व सोशल मीडिया वर संपर्क साधा. दुकानात येणार्‍या ग्राहकांशी चर्चा करा.

पैसे रेज़ करण्यासाठी पर्याय तपासा.लघु उद्योजकांसाठी उपलब्ध सरकारी योजना तपासून बघू शकता, गुंतवणूकदारांशी चर्चा करू शकता, तुम्ही केलेल्या बचतीचा वापर करू शकता, किंवा बँकेच्या प्रतिनिधीशी बोलून कर्ज घेणे शक्य आहे का हे तपासून बघा. कर्ज घेताना रीड्यूसिंग बॅलेन्स प्रक्रियाच निवडा.

कर्ज घेण्यासाठी एनबीएफसी देखील उत्तम पर्याय ठरू शकतात. एनबीएफसीत कर्जासाठी अर्ज करणे सोपे असते, व्याज दर स्वस्त आहेत आणि कर्ज लवकर वितरित केले जाते.