मी कोणत्याही कर्जाची परतफेड चुकत नाही याची खात्री कशी करावी?

#1

मला कर्ज परतफेड चुकवण्यावर काही टिप्स हव्या आहेत.

0 Likes

#2

तुम्हाला देय तारीख लक्षात न राहण्याची भीती वाटत असेल तर तुमच्या मोबाइल वर तुम्ही रिमाइंडर सेट करू शकता. कर्ज देणार्‍या कंपन्या आठवण करून देण्यासाठी ऑनलाइन अलर्ट किंवा मोबाइलवर एसएमएस पण पाठवतात.

आपण ऑटोपे पर्याय निवडू शकतो ज्यात हप्त्याच्या निर्धारित तारखेला बँक खाते किंवा क्रेडिट कार्डमधून तेवढी रक्कम वजा केली जाते.तुम्ही विसराळू असाल तर ही पद्धत तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या तारखेला तुमच्या खात्यात पर्याप्त पैसे असले पाहिजे. पैसे पर्याप्त नसतील तर तुम्हाला अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो.

आपण मासिक हप्त्याऐवजी दर आठवड्याला हप्ते भरू शकतो कारण ते भरणे थोडे सोपे होईल आणि त्याच बरोबर वेळेवर लोन फेडण्यात पण मदत होईल.

0 Likes