मला माझ्या व्यवसायासाठी लोन हवय. हे करण्यापूर्वी, अश्या कुठल्या चुका आहेत जे टाळणे आवश्यक आहे?

#1

मला माझ्या व्यवसायासाठी कर्ज पाहिजे आहे. मला त्या गोष्टींबद्दल काळजी कशी ठेवावी.

0 Likes

#2

आपला व्यावसायिक लोन लवकरात लवकर मिळवण्यासाठी ह्या चुका करू नये!

लोन मिळवण्यासाठी कर्ज देणारी योग्य कंपनी शोधणे, कागदपत्रे तयार करणे आवश्यक असतात.
बिझनेस लोन मंजूर होण्यासाठी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर हा महत्त्वाचा घटक असतो.क्रेडिट स्कोअरमध्ये काही समस्या असल्यास लोन नामंजूर होऊ शकते. म्हणून लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी व्यवसाय मालकाकडे क्रेडिट स्कोअर तयार असायला पाहिजे.

बर्याच व्यवसायातील मालकांना असे वाटते की अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज केल्याने त्यांना कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.पण यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर दुष्प्रभाव पडतो आणि लोन मिळण्याची शक्यता कमी होते.
लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराला बिझनेस प्लॅनसह अनेक आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.सादर केलेल्या कागदपत्रांच्या निरीक्षणानंतर लोन मंजूर होईल किंवा नाही हे ठरवले जाते.

लोन कशासाठी वापरणार किंवा किती लोन हवे आहे हे ठरले नसेल तर तुम्हाला लोनची योग्य रक्कम ठरवता येणार नाही.अशा परिस्थितीत, आपण आवश्यक पेक्षा कमी किंवा कमी रकमेचा कर्ज घेऊ शकता.
बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक अर्जदाराकडे व्यवसायाचे अकाऊंट्स तयार असायला पाहिजे.अकाऊंट्स उपलब्ध नसल्यास, कर्जदाराला असे वाटेल की आपण व्यवसायातील वित्त कुशलतेने व्यवस्थापित करू शकत नाही.

व्याज दराकडे नेहेमी लक्ष ठेवावे कारण बाजारात चढ-उतार झाल्यास दर बदलू शकतात.
बाजारात कर्ज देणार्या अनेक कंपन्या आहेत आणि योग्य कंपनी निवडण्यासाठी थोडे संशोधन करणे आवश्यक असते.

0 Likes