मी ऐकले आहे की लघु उद्योजकसाठी नेट-बँकिंग सुविधा खूप चांगली आहे. आपण मला त्याचे फायदे काय सांगू शकता?

मी नेट-बँकिंग वापरण्याच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छितो.

लघु उद्योजकांनी नेट बँकिंग वापरावे ४ कारण:

  • कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता लघु उद्योजकांना नेट बँकिंग सुविधा वापरता येते.
  • नेट बँकिंगमुळे तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती कधीही कुठेही पाहता येते.फक्त इंटरनेट कनेक्शन, तुमचे युझरनेम आणि पासवर्ड व स्मार्टफोन/ टॅब्लेट/ लॅपटॉप उपलब्ध असतील तर नेट बँकिंग वापरता येते.
  • नेट बँकिंग वापरुन पुरवठादार आणि इतरांना पेमेंट करण्याचे वेळापत्रक ठरवता येते.तुम्ही ठरवलेल्या दिवशी ती रक्कम आपोआप तुमच्या खात्यातून ठरवलेल्या खात्यात जमा होते.
  • नेट बँकिंगचा ‘मनी ट्रान्सफर’ (पैसे पाठवणे) पर्याय वापरुन कधीही कुठेही कोणालाही त्वरित पैसे पाठवता येते.