मी मोबाइल चा वापर करून माझ्या उत्पादनांची विक्री कसा करू?

मला माझ्या व्यवसायासाठी मोबाइल मार्केटिंग कसे वापरावे ते जाणून घ्यायचे आहे.

आपला व्यवसायची विक्री वाढवण्यासाठी आपण मोबाइल मार्केटिंग कसे वापरू शकता हयाची टिप्स खालील दिलेले आहे:

  • मार्केटिंग करण्यासाठी एसएमएस अजूनही सर्वोत्तम पर्याय आहे.
  • ‘ऑप्ट इन’ योजना निर्माण करा ज्यात ग्राहकांना साइन अप करता येईल आणि त्यांना नवीन माहिती आणि भेटवस्तू मिळतील. असे केल्याने भेटवस्तू किंवा डिसकाऊंट मिळवण्यासाठी ग्राहक तुमच्याकडे आकृष्ट होतील.
  • ग्राहक स्पर्धकांकडे जाऊ नये म्हणून तुमच्या कंपनीचे असे संकेतस्थळ तयार करा जे मोबाइल, टॅब्लेट सगळ्यावर पाहता येते.
  • एसएमएस द्वारे कूपन पाठवा. वर्तमानपत्रात छापल्या जाणार्‍या कूपनपेक्षा अधिक प्रतिसाद एसएमएस मधील कूपनला मिळेल.
  • पेमेंट स्वीकारणे, शिपिंग तपशील पाठवणे, ग्राहकांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर देणे या सगळ्या कार्यासाठी अनेक व्यवसाय मोबाइल ग्राहक सेवेचा वापर करू लागले आहेत.
  • मोबाइल ग्राहक सेवा वापरल्यामुळे ग्राहकाला त्वरित प्रतिसाद मिळतो व तो आनंदित होतो.
  • व्हाट्सएप वापरुन नियमितपणे ग्राहकांना डिसकाऊंट आणि ऑफर पाठवा.
  • डिसकाऊंट कोड, फ्लॅश सेल, कूपन, नवीन उत्पादने इत्यादीची जाहिरात करण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेटस वापरा.