मला जीएसटीसाठी नोंदणी करायची आहे. जीएसटीमध्ये काही अलीकडील बदल आहेत जे मला माहित असावे?

मला जीएसटी नोंदणी करायची आहे.

वर्तमान वर्षात (२०१९) खालील बदल केले आहेत:

  • रिटर्न भरताना उद्योजकाला कॅश बुक आणि इनपुट क्लेम (आयटीसी) याचे तपशील पाहता येतील. पण ही प्रक्रिया क्लिष्ट होती. मात्र हा पर्याय अजूनही उपलब्ध असेल.
  • या शिवाय रिटर्न ३बी मध्ये केलेल्या बदलामुळे जेव्हा उद्योजक वेबसाइट वर उलाढालींचे तपशील भरतील तेव्हाच सीजीएसटी आणि आयजीएसटी यांचे परिगणन केले जाईल.
  • ज्या व्यवसायाची एकूण उलाढाल रु ४० लाखापेक्षा कमी आहे त्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, म्हणून लघु उद्योगांना याचा खूप फायदा होईल.
  • कॉम्पोझिशन योजने अंतर्गत कर दात्याला दर महिन्याला रिटर्न भरण्याची गरज नसते.
  • या योजने अंतर्गत नोंदणीकृत करदात्याला निश्चित दरावर कर भरावा लागतो जो व्यवसायाच्या एकूण उलाढालींवर अवलंबून असतो.
  • या योजनेमुळे जीएसटी रिटर्न दर महिन्याला न भरता प्रत्येक तीन महिन्यांनी भरावा लागतो. ज्या उद्योगांची एकूण वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल.
  • इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे, वर्षभरात कोणतीही उलाढाल झाली नाही तरीही उद्योजकाला त्रैमासिक आणि वार्षिक रिटर्न भरावा लागेल.