कस्टम ड्यूटी ऑनलाइन कसा भरायचा?

मला ऑनलाइन कस्टम ड्युटी भरण्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

कस्टम ड्यूटी ऑनलाइन भरण्यासाठी खालील पद्धत वापरावा:

  1. आयसीईगेट इ-पेमेंट पोर्टलला भेट द्या.
  2. इम्पोर्ट/एक्सपोर्ट कोड प्रविष्ट करा.
  3. इ-पेमेंट वर क्लिक करा.
  4. तुमच्या नावाखाली किती थकबाकी आहे ते तुम्हाला पाहता येईल.
  5. तुम्हाला ज्या चलनचे पेमेंट करायचे आहे ते निवडा, आणि बँक किंवा पेमेंट पद्धत निवडा.
  6. त्या बँकच्या पेमेंट गेटवे कडे तुम्हाला नेण्यात येईल.
  7. पेमेंट करा.
  8. परत आयसीईगेट पोर्टल वर आणले जाईल, आणि तुम्हाला पेमेंट पावतीची प्रत हवी असल्यास प्रिंट क्लिक करा.