लघु उद्योगांसाठी भांडवलासाठी लागणारे मूल्य किती महत्त्वाचे असते?

मला एका छोट्या व्यवसायात भांडवलाबद्दल जाणून घ्यायचे आहे.

  • लघु उद्योगांसाठी रोख प्रवाह (कॅश फ्लो) अत्यंत महत्त्वाचा असतो.
  • कॅश फ्लोचा एक मुख्य घटक म्हणजे कार्यकारी भांडवल (वर्किंग कॅपिटल)
  • पुरवठादारांना पैसे देणे व ग्राहकांकडून पैसे येणे ह्यातील अवधी, पगार देणे, त्वरित पूर्ण करायच्या ऑर्डर, हंगामी उद्योगांमध्ये उतार चढाव इत्यादीसाठी लागणारी रक्कम वर्किंग कॅपिटल मधून वापरता येते.
  • दैनंदिन गरजांवर लक्ष ठेवणे त्रासदायक असते आणि अनेक वेळा पैशांची गरज व पुरवठा ह्यामध्ये अंतर निर्माण होते.
  • कर्जावरचे व्याज दर हेच “भांडवलासाठी लागणारे मूल्य” असते. कर्जाची रक्कम गुंतवली तर त्यातून मिळणारा परतावा हा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पर्याप्त असेल का ह्याचे मूल्यांकन उद्योगाला करावे लागते.
  • उद्योगातील आंतरिक आणि बाह्य घटकांचा भांडवलासाठी लागणार्‍या मूल्यावर प्रभाव पडतो.