चांगला क्रेडिट स्कोर असण्याचे कोणते फायदे आहेत?

#1

मला चांगली क्रेडिट स्कोअर असण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे.

0 Likes

#2
  • चांगला सिबिल स्कोअर असेल तर तुमच्या विषयी लोन देणार्‍या कंपनीचे चांगले मत निर्माण होते. तुमची लोनची परतफेड करण्याची क्षमता तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर ठरवली जाईल.
  • तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर तुमचा अर्ज त्वरित नामंजूर होऊ शकतो.
  • तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही लोन देणार्‍या कंपनीशी काही अटींबाबत वाटाघाटी करू शकता.
  • चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास घर, व्यावसायिक इमारती, अपार्टमेंट, ऑफिस इ सारख्या भाड्याने घेतलेल्या मालमत्तेसाठी लोन लवकर मंजूर होते.
  • चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास बहुतांश बँक क्रेडिट कार्डसाठी चांगल्या ऑफर देतात. अधिक क्रेडिट लिमिट असलेले क्रेडिट कार्ड, अतिरिक्त सुविधा, आणि चांगल्या ऑफर मिळू शकतात.
0 Likes