कर्ज देण्यापूर्वी कर्ज कंपनी कोणत्या गोष्टी तपासून पाहते?

मी माझ्या व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा विचार करीत आहे.

  • लोन देणारी प्रत्येक कंपनी व्यवसायाची वार्षिक उलाढाल तपासून पाहते. बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.
  • अर्जदाराचे वय हा महत्वाचा निकष असतो. अर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.
  • बिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योग किती वर्ष सुरू आहे हा पण एक निकष असतो. हा नियम प्रत्येक कंपनीसाठी वेगवेगळा असतो.
  • सर्व लोन देणार्‍या संस्था बिझनेस लोन देण्यापूर्वी अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरबाबत चौकशी करतात. व्यवसाय आर्थिक दृष्टया किती सशक्त आहे हे पाहण्यासाठी सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर तपासला जातो.