व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घेणे योग्य आहे का?

मी माझ्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करीत आहे.

आपल्या व्यवसायासाठी वैयक्तिक कर्जासाठी जाण्याचे काही फायदे आणि काही तोटे असू शकतात.

वैयक्तिक कर्जाचे फायदे:

  • नवीन व्यवसाय सुरू करताना कोणी तुम्हाला कर्ज द्यायला तयार होईलच असे सांगणे अवघड असते. अशावेळी वैयक्तिक कर्जासाठी मंजूरी मिळविणे सोपे असते कारण कर्ज देणारे फक्त वैयक्तिक पातळीवर तुमच्या कर्ज परतफेडीचा इतिहास व उत्पन्न तपासून बघतात.
  • तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल तर वैयक्तिक कर्ज घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
  • बहुतांश वैयक्तिक कर्जासाठी काहीही तारण ठेवावे लागत नाही. वैयक्तिक कर्जाची परतफेड वेळेत झाली नाही तर कर्ज देणार्‍याला तुमची संपत्ती ताब्यात घेता येत नाही.

वैयक्तिक कर्जाचे तोटे:

  • वैयक्तिक कर्ज घेतले की तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा धोक्यात आणता. व्यवसाय अपयशी ठरला व कर्जाची परतफेड वेळेत केली नाही तर तुमच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोरवर परिणाम होऊन तो कमी होतो.
  • कोणतेही तारण नसल्यामुळे वैयक्तिक कर्जांचे व्याज दर नेहमीच खूप जास्त असतात.

व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी या मुद्द्यांचा विचार करा.