मला माझ्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे आहे परंतु माझे क्रेडिट स्कोर खूपच कमी आहे. मी त्यात सुधारणा कशी करू शकेन?

मला माझा क्रेडिट स्कोअर सुधारवायचा आहे.

  • वेळेवर हप्ते भरण्यासाठी रिमाइंडर सेट करा कारण हप्ते भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला दंड भरावा लागतो आणि तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो.
  • तुम्ही वेळेवर बिले भरत असाल तर जुने क्रेडिट कार्ड टिकवून ठेवा. अशामुळे सशक्त क्रेडिट हिस्टरी निर्माण होते आणि क्रेडिट स्कोर चांगला राहतो.
  • लोन देणाऱ्या कंपनीशी चर्चा करावी आणि तुमच्या खर्चाच्या आधारावर क्रेडिट लिमिट ठरवून घ्यावी.
  • कमीतकमी संख्येत लोन घ्या पर्याप्त पैसे नसताना तुम्ही लोन घेतले तर त्याचा दुष्परिणाम क्रेडिट स्कोर वर होतो.
  • दीर्घावधीसाठी तारण असलेले आणि अल्पावधीसाठी विना तारण लोन निवडा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारतो.