मला उद्योगासाठी कर्ज हवय


#1

कर्ज घेताना कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील?


#2

1. तुमचे उत्पन्न किती आहे?

दैनंदिन कामात (ग्राहकांना उत्पादन विकणे व सेवा पुरवणे) मिळणारे पैसे हे तुमचे उत्पन्न असते. परत आलेली उत्पादने व दिलेले डिसकाऊंट ह्यांचा पण त्यात समावेश असतो. सगळे खर्च वजा केल्यावर उरलेले पैसे म्हणजेच तुमचा नफा.

2. तुमचे टर्नओवर किती आहे?

टर्नओवर म्हणजे तुम्ही व्यवसायात किती लवकर पैसे गोळा करू शकता किंवा किती वेगाने तुम्ही उत्पादने विकू शकता.

3. तुमचा स्टॉक किती वेळ टिकून राहतो? किती दिवसांनी तुम्हाला नवीन स्टॉक विकत घ्यायला लागतो?

तुमचा स्टॉक किती वेगाने विकल्या जातो हे मोजायचा एक मार्ग आहे. अशाने तुम्ही ओवरस्टॉक करत नाही ही खात्री करता येते. तुमच्याकडे खूप अधिक स्टॉक असेल तर ह्याचा अर्थ तुमची विक्री कमी होते आहे किंवा तुम्ही गरजेपेक्षा अधिक स्टॉक साठवले आहे.

4. गेल्या वर्षी एकूण शुद्ध लाभ (नेट प्रॉफिट) किती होता?

शुद्ध लाभ किंवा शुद्ध उत्पन्न म्हणजे विक्रीमधून उत्पादनाची किंमत, दैनंदिन खर्च, डेप्रीसिएशन, व्याज, कर, आणि इतर खर्च वजा केल्यानंतर उरलेली रक्कम. तुमच्या व्यवसायाचा हा खरा लाभ असतो. फक्त उत्पादनाची किंमत आणि विक्री केल्यानंतर मिळालेले मूल्य ह्यातील फरक म्हणजे खरा लाभ नव्हे.

5. व्यवसाय सुरू करताना भांडवल कसे उभारले?

व्यवसाय सुरू करताना लागणारे पैसे म्हणजे प्रारंभिक गुंतवणूक. तुम्ही कदाचित गुंतवणूकदारांकडून, कर्ज काढून किंवा स्वतःच्या बचती मधील भाग वापरला असेल. ह्या रकमेवर मिळणारा फायदा देखील व्यवसायाचा महत्त्वाचा भाग असतो. ही रक्कम उपकरण, मशीन, ऑफिसची जागा इ, सारख्या फिक्स्ड अॅसेट साठी वापरली जाते.

6. तुमचा एकूण लाभ (ग्रोस प्रॉफिट) किती आहे?

सोप्या शब्दात म्हणजे एकूण लाभ = उत्पन्न - उत्पादनाची किंमत. उत्पादनाची किंमत म्हणजे उत्पादन निर्माण करायला आणि विकायला लागणारा खर्च किंवा सेवा प्रदान करताना झालेला खर्च.

7. ह्या वर्षी तुमचे विकास लक्ष्य काय आहे?

तुमचे विकास लक्ष्य म्हणजे तुम्हाला व्यवसायाचा किती टक्के विस्तार करायची इच्छा आहे. अर्थात, पुढच्या वर्षात उत्पन्न किती वाढेल ह्याचा अंदाज.